Tag Archives: drought out situation

३ हजार क्षमतेच्या चारा छावण्यांना मान्यता देणार महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत, तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे २७०० कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आतापर्यंत राज्यात २८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात चारा छावण्यांची …

Read More »

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संसदीय परिषद रदद् करा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद १५जानेवारी …

Read More »

दुष्काळाबाबत सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे लातूर जिल्ह्यातून दुष्काळ पाहणी दौऱ्याला प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याबाबत वेळकाढू धोरण अवलंबले आहे. या बेजबाबदारपणाचा शेतकरी व दुष्काळग्रस्त नागरिकांना मोठा फटका बसला असून, सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. बुधवारी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना …

Read More »

अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे. राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील …

Read More »

मोदींनी जाहिर केलेली दुष्काळमुक्त गावे ८ दिवसांत दुष्काळसदृश कशी झाली? राज्यातील ३१ हजार ०१५ गावांतील पाणी पातळीत घट म्हणजे घोटाळा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शासनाच्या म्हणण्यानुसार, जलयुक्त शिवार अभियानाला एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यात लोकसहभाग १० टक्के देखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा दडविण्याकरिता सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार दया आणि भारनियमनमुक्त महाराष्ट्र करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्रांचे पथक येण्याची वाट पाहिली जात आहे. …

Read More »

फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’! शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी देण्याची विखेंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र गंभीर दुष्काळाने होरपळून निघाला असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास विलंब करीत असून, दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील …

Read More »

तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

औसा : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि …

Read More »

दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत …

Read More »