Tag Archives: ED

अनिल अंबानी यांच्या रिलायन्सभोवती बंधने केली कडक एमसीएने निधी वळविण्याच्या प्रकरणाची चौकशी करणे दिले आदेश

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपभोवती नियामक बंधने आणखी कडक करण्यात आली आहेत, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) अनेक ग्रुप कंपन्यांमध्ये कथित निधी वळवण्याच्या प्रकरणाची नवीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला एमसीएने हाताळलेला हा तपास आता गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडे सोपवण्यात आला आहे, प्राथमिक निष्कर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची उलाढाल …

Read More »

ईडीचा १० वर्षातील कन्व्हेशन दर माहित आहे का? फक्त १ टक्का काँग्रेसची ईडी आणि भाजपावर टीका

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मंगळवारी संसदेत सांगितले की अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २०१५ पासून १० वर्षांत राजकीय नेत्यांविरुद्ध एकूण १९३ खटले दाखल केले आहेत. परंतु त्यापैकी फक्त दोन प्रकरणांमध्येच त्यांना शिक्षा झाली आहे, म्हणजेच शिक्षा होण्याचा दर सुमारे १% आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असून काँग्रेसने ईडीला “भाजपाचा आघाडी सहयोगी” …

Read More »

कन्नड अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज फेटाळला ईडीच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

सोने तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या राव यांना आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने जामीन नाकारला, कारण तिच्यावरील आरोप गंभीर आहेत. न्यायाधीश विश्वनाथ सी. गौदार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने फिर्यादी पक्षाशी सहमती दर्शवली की रान्या यांना न्यायालयीन कोठडीतच राहावे. रान्या राव यांना एका हाय-प्रोफाइल सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांनी …

Read More »

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?

पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …

Read More »

खिचडी घोटाळ्याप्रकऱणी सूरज चव्हाण यांच्या अटकेचे ईडीकडून समर्थन खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण

कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राजकीय हितसंबंधांचा वापर करून त्यांनी खिचडी वापटाचे कंत्राट मिळवले होते, त्यामुळे चव्हाण यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयात सूरज चव्हाण …

Read More »

सीबीआयला फटकारत सर्वोच्च न्यायालयाचा अरविंद केजरीवाल यांना जामीन ट्रायल न्यायालयात प्रकरण न पाठविण्याचे आदेश

दिल्लीतील लीकर पॉलिसी प्रकरणी ईडीच्या अटकेत असताना सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. या अटकेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचा युक्तीवाद फेटाळून लावत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर पुन्हा अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी पुन्हा ट्रायल न्यायालयात पाठविले जाणार नसून केजरीवाल यांना मेरिटच्या आधारेच …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल प्रकरणी आदेश राखून ठेवला

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की अरविंद केजरीवाल यादरम्यान ट्रायल कोर्टाकडून जामिनासाठी अर्ज करण्यास स्वतंत्र असतील. २१ मार्च …

Read More »

डॉ भालचंद्र मुणगेकर यांची मागणी, अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान धादांत खोटे व बेजबाबदारपणाचे आहे. अंबानी-अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत असे असताना राहुल गांधींकडे बोट करणे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी यांना तसे वाटत असेल तर त्यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, जर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला तर…

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम सवलत फक्त त्या अटीवरच दिली जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य …

Read More »

अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद, घोटाळ्यातील पुरावे मिळाले नाहीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी जीवन आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने …

Read More »