Breaking News

Tag Archives: education minister

दिपक केसरकर यांची माहिती, सैनिकी शाळांच्या सुधारीत धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता ३०४ कंत्राटी पदे भरणार

राज्यातील खाजगी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या (३० सप्टेंबर रोजीच्या) बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुढे बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये भरती व्हावेत व देशाची सेवा करावी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील …

Read More »

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »

वाढीव पदांवर २८३ शिक्षकांच्या समायोजनास राज्य सरकारची मान्यता

वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या धमकावता…प्रश्नावर, मंत्री केसरकर म्हणाले, दोन महिन्यात… अहो तुमचे संकेतस्थळच बंद आहे

राज्यात शिक्षकांच्या रिक्त पदभरतीबाबत एका उमेदवाराने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्या उमेदवाराला थेट धमकाविता आणि संकेतस्थळ तपासायला सांगता. तुमचे मंत्री म्हणून असलेले धमकीप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अहो तुमची वेबसाईट अजूनही बंद आहे जरा तपासून पहा मग उमेदवारांना धमकी द्या असा खोचक सल्ला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ …

Read More »

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सूचना

पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य …

Read More »

१२ वीच्या परिक्षेला १४ लाख ५७ हजार विद्यार्थीः ३ हजार केंद्र सज्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, जून्या पेंशन योजनेत मध्यमार्ग काढत शिक्षकांची ३० हजार पदे भरणार राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्र्याची घोषणा

शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय …

Read More »

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून १० सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन …

Read More »