शिंदे गटाच्या राजेश शहाच्या मुलाचा प्रतापः बीएमडब्लू कारने महिलेचे प्राण घेऊन फरार पोलिसांकडून शोधाशोध सुरु केल्याची माहिती

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पैसेवाल्या आणि सत्तेची धुंदी चढलेल्या नेत्यांच्या पोरांच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या हिट अॅण्ड रन या घटनेची भर पडली आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या पोराने मुंबई वरळी येथील एका मच्छिमार महिलेला धडक तर दिली. पण नंतर सदर महिलेच्या अंगावरून गाडी घालून त्या महिलेला जीवे मारल्याची घटना आज पहाटे वरळी येथे घडल्याची माहिती पुढे आली.

वरळीच्या कोळीवाडा भागातील रहिवासी असलेले पीडित महिला ससून डॉकमधून मासे खरेदी करून नुकतेच परतत असताना अट्रिया मॉलजवळ राजेश शहा यांच्या नावे असलेल्या बीएमडब्लू कारने धडक दिल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.

सदरची महिला तिच्या पतीबरोबर मासे विक्रीसाठी आज रविवारी पहाटेच्या ५ ते ५. ३० वाजता स्कूटरने जात होती. त्यावेळी राजेश शहा यांचा पोरगा मिहिर शहा यांने पहाटे बीएमडब्लू कारने स्कूटरने जाणाऱ्या या मच्छिमार जोडप्याला मागील बाजूने धडक दिली. या धडकेत स्कूटरवर असलेली महिला आणि तिचा पती खाली पडले. त्यावेळी मयुर शहाने सदर दोघेही पडल्याचे बघून घटनास्थयलावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदरची बीएमडब्लू गाडी तशीच त्या महिलेच्या अंगावरून घालत तेथून पळ काढला. या दरम्यान सदर महिला बीएमडब्लू गाडीसोबत बरेच लांब फरफटत गेली. त्यातच सदर महिलेचा मृत्यू झाला. तर राजेश शहा यांचा पोरगा मिहिर शहा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

मिहिर शहाचे वडील आणि पालघर जिल्ह्यातील शिंदे सेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावावर बीएमडब्ल्यूची नोंदणी करण्यात आली होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये उपस्थित असलेला राजेश शहा यांचा चालक राजऋषी बिदावत यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मागून झालेल्या या धडकेत मच्छीमार गंभीर जखमी झाला .प्रदीप नाखव (वय ५०) आणि त्यांची पत्नी कावेरी नाकावा (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिहिर शहाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा कारमध्ये मिहिरचा ड्रायव्हरही त्याच्यासोबत होता.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी केली जाईल. मुंबईत घडलेली हिट अँड रनची घटना दुर्दैवी आहे. मी पोलिसांशी बोललो आहे, आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्वांना समान वागणूक दिली जाईल, असेही यावेळी सांगितले.

दरम्यान, शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेच्या पतीची भेट घेतली. त्यांनी आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आवाहन केले आणि हिट अँड रन प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाण्याचे आवाहन केले.

“आज वरळी पोलिस स्टेशनला भेट दिली आणि आज वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मी हिट अँड रनचा आरोपी मिस्टर शहा याच्या राजकीय ओढाताणीत जाणार नाही, पण मला आशा आहे की पोलिस आरोपीला पकडण्यासाठी आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्वरीत कारवाई करतील, अशी आशा आहे की शासनाकडून कोणताही राजकीय आश्रय मिळणार नाही, आशाही एक्स X वर प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, मृत महिलेचे पती प्रदीप नाखव यांनी आमच्या गरीबांचं कोणी ऐकणार आहे की नाही फक्त पैशेवाल्यांचेच हे सरकार ऐकणारं आहे का अशी भावना व्यक्त करत आमच्या घरातील ती कमावती एकमेव व्यक्ती होती. आज सरकारच्या विरोधात बोलतोय असे मिडीयावाले आणि पोलिसवाले सांगणार अन् परत ते सत्तेतल्या लोकांना आणि पैशेवाल्यांनाच छुपी मदत करणार अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *