Tag Archives: farmers

शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या …

Read More »

छगन भुजबळांनी धरले धारेवर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही ; छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीचा सभात्याग

राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या …

Read More »

विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, मगरीचे अश्रू… अवकाळीचा आठ जिल्ह्यांना फटका; १३ हजार हेक्टरवर नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने मदत जाहीर करा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे, संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत …

Read More »

मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. या नैसर्गिक संकटामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके वाया गेल्याने हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी …

Read More »

भरसभेतच अजित पवार म्हणाले, … तर कशाला खोके सरकार आलं असतं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत जाब विचारणार

सध्या चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यातील मुद्दे यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आज भाषणातही अजित पवारांनी सरकारवर विविध मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल केला. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईबद्दल उद्या सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले. आज पाथर्डीमध्ये …

Read More »

सरकार सर्वसामान्यांचे पण संकटसमयी सरकारमधील मंत्री कुठे झाले गायब? शिंदे समर्थक मंत्री ऐरवी टिव्ही दिसणारे संकटावर बोलायलाही दिसेना

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. या नऊ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री जाहिर कार्यक्रमातून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सातत्याने जाहिरपणे सांगत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार असल्याचेही सातत्याने सांगत असतात. मात्र ऐरवी प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे गटाच्या …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, … नुकसान मोठं पण सरकार शेतकऱ्यांच्या सोबत होळीचे रंग अर्थसंकल्पातून दिसून येतील

राज्यातील कोकण विभागातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारा बरसल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारकडून काय मदत जाहिर करणार अशी विचारणा करण्यात आला त्यावर उत्तर देताना …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व …

Read More »

१०१ शेतकऱ्यांची मागणीः पिकाला भाव मिळत नाही, राष्ट्रपतीजी इच्छा मरणाला परवानगी द्या राष्ट्रपती मुर्मु यांना पत्र लिहित केली मागणी

मागील काही महिन्यापासून नगदी पिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा, द्राक्षे, कापूस आदींसह भाजीपाल्यास बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला आणि अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने इच्छा मरणा परवानगी द्यावी अशी मागणी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील १०१ शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडत …

Read More »