गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक …
Read More »लालबागचा राजाच्या विसर्जनाला भरती-ओहोटीचे विघ्न विसर्जन रात्री ११ वाजता होणार
रविवारी भव्य गणेश विसर्जनादरम्यान लालबागच्या राजाला निरोप देताना भाविकांचा प्रचंड समुद्र मुंबईत पावसाच्या सरीकडे पाहायला मिळाला. तथापि, पहिल्यांदाच, भरती-ओहोटीमुळे प्रतिष्ठित लालबागच्या राजा मूर्तीचे विसर्जन उशिरा झाले, असे एका वृत्तसंस्थेने दिले. आता, विसर्जन रात्री ११ वाजता होणार आहे. साधारणपणे, लालबागच्या राजा मूर्तीचे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात सकाळी ९ वाजण्यापूर्वी …
Read More »राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर गणरायाला निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक मंडळांनी निरोप दिला
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, …
Read More »गणेशोत्सव : राज्य उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन
राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास २०२५ पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातील ४०४ मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे …
Read More »‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा …
Read More »आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचे लोकार्पण महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा
सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती …
Read More »आशिष शेलार यांचे आवाहन,“राज्य महोत्सवा” करिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी गणेशोत्सव सण पहिल्यांदाच सरकारकडून साजरा केला जातोय
गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक …
Read More »कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रीम तलावाच्या अनुषंगाने वाढती नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत …
Read More »गणेशभक्तांच्या टोलमाफीसाठी एकनाथ शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात श्रेय वादाची लढाई कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी
मागील अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या सण काळात सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून कोकणात जाऊ गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची चढाओढ लागत असे. त्यामुळे ज्या मतदारसंघात कोकणवासिय जास्त भागातील मतदार कम नागरिकांसाठी एक प्रकारचे आमिष म्हणून मोफत बसने कोकणात नेले जात असे. त्यानंतर आता कोकणवासियांकडे वाहन घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर या वाहनांना …
Read More »मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी सकाळी ८ ते रात्रो ११ वाजेपर्यत वाहनांना नो एन्ट्री
गणेशोत्सवासाठी मुर्तीचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री …
Read More »
Marathi e-Batmya