Tag Archives: gulabrao patil

उदय सामंत यांची माहिती, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी पाच तालुक्यांचा डी प्लस वर्गवारीत समावेश

जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव …

Read More »

पाण्यातील नायट्रेट पातळीत वाढः प्रश्नच समजेना, वाद मात्र गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांच्या प्रश्नावरून मंत्री-अध्यक्ष संभ्रमात

राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेट-नायट्रोझनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार त्या पाण्याला फिल्टर करणार की नव्याने फिल्टर बसविणार असा सवाल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत यासंदर्भात जी पाच प्रश्न मी उपस्थित …

Read More »

शिवसेना-भाजपामधील वादानंतर आता अमोल मिटकरी-गुलाबराव पाटील यांच्यात नवा वाद सत्ता स्थापनेच्या आधीच महायुतीत रंगतोय वाद

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या आधीच करबुरी वाढायला लागल्या आहेत. आधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपातील देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्लीत महायुतीचे तिन्ही नेते भाजपा नेते अमित शाह यांना मंत्री वाटपावरून भेटले तरी तिघांपैकी अजित पवार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

जलजीवन मिशनसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज शहरातील गुरू दक्षिणा …

Read More »

जळगांव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

जळगांव जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे

राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल, फडणवीसांना नेमकी कोणती अडचण…घोटाळेबाज आणि गुंडांची… मुंबईला गेल्यावर कागदपत्रे फडणवीसांकडे पाठविणार

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळातील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. जळगावात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, गुलाबो गँग….पालकमंत्री असताना ४०० कोटींचा भ्रष्टाचार काही दगड आमच्याकडे सोनं म्हणून होते पण ते दगडच निघाले

राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगावातील पाचोऱ्यात आज येत आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सभेपूर्वीच एकमेकांवर टीका टीपण्णीचे वाक्ययुध्द चांगलेच रंगल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. या सगळ्या वाक्ययुध्दात खासदार संजय राऊत …

Read More »

गुलाबराव पाटील यांचा उध्दव ठाकरेंना उपरोधिक टोला, …तर देव तुमचं भलं करो शिवसेना हा शब्द खाली जावू नये म्हणून बलिदान देणाऱ्यांना गद्दार म्हणता..

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यातलं घमासान सुरूच आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणातून बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत आहेत. तर गुलाबराव पाटील देखील त्यावर प्रत्युत्तर देत आहेत. आज ८ एप्रिल रोजी रायगडमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच ज्या काँग्रेस आणि …

Read More »