Tag Archives: health dept.

लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तत्पर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यास, वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आरोग्य सेवेतील ६८० जणांना नियुक्ती पत्राचे वाटप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील गट ड संवार्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना धक्काः या कामाला दिली स्थगिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील ३२०० कोटी रूपयांच्या कामाला दिली स्थगिती

माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य विभागाचा कारभार तानाजी …

Read More »

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई या संस्थेच्या मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला. मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली …

Read More »

रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, रुग्णवाहिका खरेदीत मोठा भ्रष्टाचार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी …

Read More »

विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपावर अखेर आरोग्य विभागाचा खुलासा

मागील दोन आठवड्यापासून काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्याकडून आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सतत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर जवळपास आठभडानंतर आरोग्य विभागाने अॅब्युलन्स टेंडर निविदेतील घोटाळ्याप्रकरणी खुलासा आज केला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया …

Read More »