राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …
Read More »चंद्रकांत पाटील यांची घोषणा, राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले
महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले आहे. त्यामुळे आता एमएचटीसीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात झालेल्या एमएचटीसीईटीच्या परीक्षेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरती मान्यता अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के होणार पदभरती
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत निर्णय
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार देण्याचा प्रस्ताव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी “कमवा आणि शिका” योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. योजनेतील या सुधारणामुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …
Read More »भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव” सहा हजार महाविद्यालयांमध्ये राबविणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या …
Read More »राज्यात १ हजार ४९९ नवी महाविद्यालये सुरु होणारः मुख्यमंत्र्यांची मान्यता नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता
राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी …
Read More »शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था …
Read More »के. सी. महाविद्यालयात ‘जी २० युवा संसद- भारत @२०४७’ कार्यक्रम देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एच. एस. एन. सी. विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी …
Read More »
Marathi e-Batmya