Tag Archives: india

भारत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनणार एस अँड पी ग्लोबलचा दावा

गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक मोठे टप्पे गाठले आहेत आणि सध्या ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुवर्ण केंद्र मानले जात आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटने असा दावा केला आहे की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल आणि २०३० पर्यंत जगातील तिसरी …

Read More »

भारतात बनवली जाईल जगातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप चीनचा दबदबा मोडीत काढण्यासाठी भारताचे एक पाऊल पुढे

तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनचा दबदबा आजही जगभरात कायम आहे. या वर्चस्वाच्या जोरावर चीन प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवत असून आता चीनचे युग संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण भारताने तंत्रज्ञानाच्या दुनियेत आपले पाय आणखी खोलवर रोवले आहेत. चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी भारताने ‘मेड इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मोबाइल फोनचे भारतीय बनावटीचे …

Read More »

भारतात ऑलिम्पिक झाल्यास फ्रान्स सहकार्य करणार फ्रांसचे वाणिज्यदूत ज्यां मार्क सेर-शार्ले यांचे प्रतिपादन

पुढील वर्षी २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये होणार असून २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यास भारत उत्सुक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. भारताने जी – २० परिषदेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे भारत ऑलिम्पिक स्पर्धांचे देखील यशस्वी आयोजन करेल, असे सांगताना भारतात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास फ्रान्स आपल्या अनुभवाचा …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला चीनला दिला दणका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आनंदाची बातमी दिली आहे. आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण आता तो ६.३ टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे की एप्रिल ते जून या तिमाहीत खूप मजबूत खप …

Read More »

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …

Read More »

परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

खलिस्तानी

भारत आणि कॅनडामध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर पाऊलं उचलत असल्याचं दिसत आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तान समर्थकांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तानी नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे ओव्हरसीज सिटिझनशीप म्हणजे ओसीआय कार्ड रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारने तपास यंत्रणांना दिल्या आहेत. भारताच्या या निर्णयामुळे …

Read More »

अमेरिकेचा दावाः भारतावर कॅनडाने आरोप करण्यापूर्वी गुप्तहेर संस्थेने माहिती दिली फाईव्ह आईज् पार्टनर्सला गुप्तहेर संघटनेने माहिती दिली

भारताने हरदीपसिंग निज्जर याला ठार मारल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्सने दिल्यानंतरच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ यांनी जाहिररित्या कॅनेडियन नागरिकाची हत्या केल्याचा आरोप भारतावर केल्याचा दावा अमेरिकी राजदूताकडून करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त भारतातील एका शासकिय वृत्तसंस्थेने दिले. हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्स गुप्तहेर संघटनेला …

Read More »

इंडिया बैठक समन्वयासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट समन्वयाच्या विषयावर दिडतास बैठक

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ ची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीदरम्यान संसदेचे ऐन गणेशोत्सवात असलेले अधिवेशन, मराठा आरक्षण आदी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ५० टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज संसदेत महिलांना आरक्षण दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्के होऊन वाढवून ६५ टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु तसे केंद्रातलं भाजपा सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्र सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला …

Read More »