Tag Archives: konkan

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण… काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा;

नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी १६० रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे …

Read More »

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या मध्य रेल्वेकडून कोकण, दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटे आरक्षित करण्यासाठी झुंबड उडते. मात्र अनेकांना आरक्षित तिकिटे मिळाली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करत एकतर प्रवास करावा लागतो किंवा खाजगी वाहनाने अवाच्यासव्वा दराने प्रवास करावा लागतो. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे यासाठी सुट्टीचा आनंद घेता …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल, हे सरकार अदानीसाठी की सर्वसामान्यांसाठी ? राज्यात कायदा सुव्यस्था राखण्यास सरकार अपयशी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

कोकणात अदानीला कंपनीला जमीन देण्यासाठी बेकायदेशीर रित्या जमिनीची खरेदी विक्री सुरू आहे. संगमनेर येथे बोगस व्यवहार सुरू असून मूळ मालकाची परवानगी न घेता हे व्यवहार केले जातात. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. विरोधकांवर ईडी सीबीआयची चौकशी लागते, याप्रकरणीही तपास करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे …

Read More »

तिल्लोरी कुणबी जात प्रमाणपत्राबाबत मंत्री अतुल सावे यांचे विधानसभेत आश्वासन १५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेणार

विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते. तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल आणि येत्या १५ दिवसात याबाबत विस्तृत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. कोकणातील तिल्लोरी कुणबी समाजाच्या लोकांना …

Read More »

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका

दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …

Read More »

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान

कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद …

Read More »

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार भराडी देवीच्या यात्रेला पहिल्यांदाच गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

“आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतले. …

Read More »

विधान परिषदेसाठी नाशिक आणि अमरावतीत ४९ तर सर्वाधिक कोकणात मतदानाची टक्केवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघात राजकिय चुरस निर्माण झाल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाकडून चांगलीच रंगत आणली. विशेषतः नाशिक मतदारसंघातील तांबे पिता-पुत्राने …

Read More »

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून कोकणातील ३८८ गावे वगळणार पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून कोकणातील ३८८ गावे वगळणार

जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, रत्नागिरीतील ९८ गावे आणि कोकणातील ३८८ गावे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील …

Read More »