कोंकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोंकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोंकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोंकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोंकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री …
Read More »वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक
वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्विरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …
Read More »मतदार नोंदणी सुरुः गृहनिर्माण सोसायट्यांध्ये मतदान केंद्र उभारणार विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा दिलासा, गणेश भक्तांना टोल माफी, पण पासेस या ठिकाणी असा मिळणार कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही …
Read More »पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी गणेशोत्सव काळासाठी राज्य सरकारचा निर्णय
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते …
Read More »हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज
मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …
Read More »आंब्याचे उत्पादन वाढविणे, किडीमुळे नुकसान थांबविण्यासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा
अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, याशिवाय आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »एकल नव्हे एकत्रित कुटुंब हवे! कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचा ५ वा वर्धापनदिन उत्सहात साजरा
अंतर्गत मतभेदामुळे सध्या एकल कुटुंब पद्धत वाढल्याने जनरेशन गॅप वाढत आहे. परंतु मुलांची जडण- घडण, त्यांच्यावर संस्कार होण्यास एकत्रित कुटुंब पद्धत गरजेची असल्याचे प्रतिपादन कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रदिप म्हादे यांनी केले. रविवारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा दिवा येथील शिवलिला अपार्टमेंट मोठ्या …
Read More »चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …
Read More »कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार या निर्णयाचा फायदा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस
महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१७ कोटी रुपये खर्चाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस, ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत करण्यात आली. उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प …
Read More »
Marathi e-Batmya