निष्ठावान म्हणून शिवसेना उबाठा पक्षात ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मागील काही काळात वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच उपसभापती पदावर कायम राहता यावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची आमदारकी धोक्यात आली. मात्र त्यांच्या अपात्रतेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीचा तीव्र शब्दात धिक्कार..
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. याबाबत निवेदन …
Read More »विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप
विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली
अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान …
Read More »विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक निवडणुकीची अधिसूचना १० मार्च रोजी जारी होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. विधानपरिषदेच्या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे या सर्व जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जागांसाठी पुन्हा एकदा …
Read More »अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वॉक आऊट
संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …
Read More »राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान नवनिर्वाचित सात आमदारांनाही प्रतिवादी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
राज्यपालनिर्देशित विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवलेला असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केलेल्या शिफारशीनुसार वर्तमान राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी सात आमदारांची नियुक्ती केल्याचा दावा उबाठा गटाकडून करण्यात आला. तसेच, राज्यपालांच्या निर्णयाला नव्याने जनहित याचिकेद्वारे मंगळवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तथापि, ही याचिका योग्य ठरवण्यात आल्याचा …
Read More »विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या ११ …
Read More »उदय सामंत यांची माहिती, बोगस डॉक्टरप्रमाणे बोगस पॅथॉलॉजी लॅब शोध मोहिम कारवाईसाठी लवकरच कायदा आणणार असल्याची घोषणा
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. तसेच जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. …
Read More »बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya