विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली.

यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या ११ सदस्यांनी शपथ घेतली.

विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

About Editor

Check Also

दादाजी भुसे यांची माहिती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *