Tag Archives: loksabha election 2024

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या …

Read More »

एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …

Read More »

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीच्या आज चवथ्या टप्प्यात जवळपास ९३ मतदारसंघात मतदान पार पडले. या निवडणूकीत महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातही मतदान पार पडले. दरम्यान, पुणे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान आणि मतदारांना मतदाना आकर्षित करण्यासाठी रोख रकमेचे वाटप करण्यात आल्याची घटना काही मतदारांनी तर काही राजकिय कार्यकर्त्यांनी केली. महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, …

Read More »

मुंबईतील दोन उमेदवारांवर खर्च नोंदवही सादर न केल्यामुळे गुन्हे दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी ९ मे २०२४ रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स …

Read More »

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन

लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र प्रथेनुसार प्रत्येक सत्ताधारी पक्षाकडून निवडणूकीच्या आदल्या रात्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात येतात. याच प्रलोभनाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम टॉनिकचा वापर करण्यात येतो. पुण्यातील काँग्रेसचे आमदार तथा लोकसभेचे उमेदवार …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे …

Read More »

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, …

Read More »

मुंबईत २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी …

Read More »