Tag Archives: maharashtra police

अजित पवारांचा इशारा, …नाहीतर पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ येईल पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र …

Read More »

महाराष्ट्रातील या ११ पोलिसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक” “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा

पोलीस भरती

सन २०२२ च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये  महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन २०२२ साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक” (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात सन २०१८ पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »

पोलिसांसाठी खुषखबरः किरकोळ रजेच्या संख्येत होणार वाढ १२ वरुन लवकरच २० करण्यात येणार- गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर कामाचा असतो हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांचाही कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, याशिवाय पोलिसांच्या घरांचा आणि आरोग्याचा प्रश्न सोडवावा आणि वार्षिक किरकोळ रजांची संख्या १२ वरुन २० करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी लक्षवेधीद्वारे केली. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई …

Read More »

या ९७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक २०२० सालच्या पोलिस पदकं सन्मानपूर्वक प्रदान

पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके …

Read More »

महाविकास आघाडीची पोलिसांना खुषखबर: आता पोलीस अंमलदारांची होणार पदोन्नती मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, …

Read More »

गृह विभागाचे माजी प्रधान सचिव रजनीश सेठ राज्याचे नवे पोलिस महासंचालक राज्य सरकारकडून अखेर पूर्णवेळ नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून आणि तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधनक विभागाचे प्रमुख म्हणून कामगिरी बजाविलेले रजनीश सेठ यांची आज राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती केली. त्यामुळे अखेर राज्याला पूर्ण वेळ पोलिस महासंचालक मिळाला असल्याची भावना पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल …

Read More »

सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून माझ्यावर जीवघेणा हल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आरोप

मराठी ई-बातम्या टीम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पवारांनी माझ्यावर ३०० ते ४०० जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी आटपाडी पोलिसांकडून सदरच्या जमावावर कारवाई करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण करत होते असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री जयंत पाटील आणि पवारांवर एका …

Read More »

माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? पेपरफुटी तपासावरून नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन …

Read More »

प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करणार राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर ‘अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. राज्यातील व विशेषता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा मंत्रालयात आयोजित …

Read More »