Tag Archives: mahavitaran

महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना लाभ ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे. जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ …

Read More »

औद्यगिक न्यायालयात महावितरणच्या ७ कर्मचारी संघटनांची संपातून माघार मेस्मा कायदा लागू केल्यानंतर महावितरणची औद्योगिक न्यायालयात धाव

कामगार आयुक्त कार्यालयात समेट प्रकरणावर कार्यवाही सुरू असताना ७२ तासांच्या बेकायदा संपावर जाणाऱ्या ७ वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीविरुद्ध महावितरणकडून मुंबई औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीने संपातून २४ तासानंतर माघार घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, गेल्या दीड दिवसांच्या …

Read More »

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच …

Read More »

ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

महावितरणची नव्या वर्षाची भेटः नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध होणार

कृषीपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा …

Read More »

महावितरणचे आवाहन, वाढीव पेन्शन योजनेसाठी निवृत कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करा २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना – १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी …

Read More »

बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी …

Read More »

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित …

Read More »

वीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कारखान्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल

सर्वाधिक वीजदरामुळे राज्यातील पोलाद कारखान्यांनी परराज्यात स्थलांतर केले असा दावा करताना काल ज्या कारखान्यांचा उल्लेख केला त्यांचे काम आठ ते तेवीस वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. वीस वर्षांपूर्वी राज्यात बंद झालेल्या कारखान्यांच्या नावांचा वापर करून जनतेची दिशाभूल करणे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी व्यक्त केली. विदर्भ …

Read More »

नवरात्र उत्सव मंडळांनो अधिकृत वीजजोडणी घ्या अन् अपघात टाळा अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या …

Read More »