Tag Archives: marathi writer and publication houses

राज्य शासनाकडून या साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

मराठी ई-बातम्या टीम राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आलाआहे. पाच लाख रु.रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील   यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी)  मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे. अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य 1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 …

Read More »