सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला …
Read More »मविआ सरकार साजरी करणार भारतरत्न डॉ. आंबेडकरांची १० दिवस जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार - धनंजय मुंडे
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. ६) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली …
Read More »ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही
ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकासंदर्भात घेतला “हा” निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ही माहिती
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक मनी लॉड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर मलिक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात हेबाब कार्पोस याचिका दाखल करत अटक कारवाईला आव्हान दिले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सध्या तरी मलिक हे लगेच बाहेर येण्याची शक्यता …
Read More »जे.जे. रुग्णालयातील पात्र वारसदारांना नियुक्त्या देणार: लाड पागेसह नवी समिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
भायखळा येथील सर जे.जे. रुग्णालयातील पात्र असलेल्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यांचे अभिप्राय दोन-तीन दिवसात मिळाल्यास पुढील आठवड्यात संबंधित वारसदारांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश काढण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख …
Read More »
Marathi e-Batmya