Tag Archives: mns chief raj thackeray

अजित पवार म्हणाले, …विरोधात प्रचारसभा घेणाऱ्यांनी उलटी प्लेट लावली मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली टीका

मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट सोसल्यानंतर त्यातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना काहीजण अचानकपणे भोंग्याचे राजकारण करून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल

शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुखांशी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज संवाद साधत शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यत न्या असे आवाहन करत येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असल्याचे सांगत मी तुमच्याबरोबर फिरण्यासाठीच धोके पत्करून माझ्यावरील शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले.  शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब …

Read More »

राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्यास एक लाखाचा दंड औरंगाबाद उच्च न्यायालयाने याचिका लावली फेटाळून

हनुमान जयंती दिवशी पुण्यात हनुमान मंदिरात जावून महाआरती केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकिय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत सभेला परवानगी देवू नका अशी मागणी केली. राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी …

Read More »

३० एप्रिल आणि १ मे ला तीन मोठ्या राजकिय घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय गोष्टींना गती

राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकिय घडामोडी होणार आहेत. ३० एप्रिल रोजी पुण्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्रात “सत्तेचे भोगी” म्हणत राज ठाकरेंनी केले “योगी आदित्यनाथां”चे अभिनंदन भोंगे उतरविल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

जवळपास २० दिवसांहून अधिक काळ मनसेने राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक पवित्रा घेत भोंगे उतरवा नाही तर मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मात्र त्यानंतर टीका-टीपण्णीला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळावरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी …

Read More »

शिवसेना म्हणते, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्यात… गृहमत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे विरोधी पक्ष राज्याचे खरे शत्रू

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना या राज्यात दंगल घडावी आणि सामान्य माणूस त्यात भरडला जावा हाच उद्देश दिसतोय. उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेणारे विरोधी पक्ष हेच या राज्याचे आणि इथल्या जनतेचे खरे शत्रू आहेत असा आरोप शिवसेना आमदार आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तकलादू हिंदुत्ववादी आलेत त्यांचा समाचार घ्यावा लागणार लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे केले जाहीर

जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोर्पयन्त तुम्ही काढू नका, मागे बोललो होतो तरी पुन्हा बोलतो, मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, …

Read More »

…तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरात संकल्प सभेने समारोप

केंद्र सरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा नक्कीच समाचार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर संकल्प सभेत दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरेची अवस्था, पिंजरा सिनेमा मधील मास्तर सारखी धार्मिक द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता हे समजायला हवं हा फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे-छगन भुजबळ

धार्मिक द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता हे समजायला हवं हा फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे जातीयवादाला थारा नाही असे प्रतिपादन करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे  आज कोल्हापूर येथील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निरोपावेळी विरोधकांवर कडाडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस …

Read More »

जितेंद्र आव्हाड म्हणाले, भोंग्याच्या मागून कोण बोलतंय… हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व देऊ नका - जितेंद्र आव्हाड

भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय. त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म …

Read More »