मराठी ई-बातम्या टीम केंद्र रकारच्यावतीने संसदेच्या पटलावर ओबीसींच्या संदर्भातील इम्पिरिकल डेटा ९७ टक्के योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हाच डेटा योग्य नसून यावरुन ओबीसींची संख्या ठरवता येत नसल्याचे सांगितले म्हणजे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची किंवा संसदेची दिशाभूल केलेली आहे. निश्चितच याविषयी संसदेत सरकारला जाब विचारण्याचे काम …
Read More »मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; आता आश्वासनांची पुर्तता लवकर करा- नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन संपवून शेतकरी आपल्या घरी जात आहेत ही देशासाठी आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत व एमएसपी कायद्यासह सर्व आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर …
Read More »अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार अनुदान सहाय्यतेत मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देत असल्याच्या आमच्या संशयाला पुष्टी मिळते आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात …
Read More »काँग्रेसच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजार रू. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार सानुग्रह सहाय्य
मुंबई : प्रतिनिधी कोविड काळात मृत्यूमुखी पावणाऱ्यांच्या वारसांना मदत काय देणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केल्यानंतर त्या वारसांना ५० हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाही मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राने राज्याला पत्र पाठविल्यानंतर ५० हजार ही फारच तुटपुंजी रक्कम असून त्याऐवजी ४ लाख रूपयांची …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याबाबत केली ही मागणी कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ४ लाखाचे भरपाई द्या
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जवळपास दिड लाख नागरीकांचा मृत्यू झाला. तर संपूर्ण देशभरात लाखो नागरीकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केलेले असतानाही केंद्र सरकारने या आजारामुळे मृत्यू पडलेल्यांसाठी केवळ ५० हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहिर केले. मात्र ही रक्कम फारच …
Read More »मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आवाहन
नाशिक: प्रतिनिधी देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही. आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल …
Read More »६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा उद्योगाच्या ताफ्यात सर्वाधिक बोली लावत एअर इंडियाचा ताबा मिळविला
नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी एअर इंडियासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. त्यामुळे ही विमान कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची झाली. टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त बोली लावली होती. एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांकडे आली आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती. तेव्हापासून टाटा समूह एअर इंडियाचा ताबा …
Read More »शेतकरी-कामगारांना गुलाम बनविण्याचे काम मोदी सरकारने केले शेतकरी संघटना, डाव्या पक्षांनी पुकारलेल्या ‘भारतबंद’ मध्ये काँग्रेसचा सक्रीय सहभाग
अकोला: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »तीन काळे कृषी- कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात विरोधी पक्षांचा एल्गार झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले
अकोले: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील …
Read More »एलआयसीच्या आयपीओमध्ये सरकारला नकोय चिनी गुंतवणूक रोखण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यांयाचा विचार
मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी -LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओ (IPO) मध्ये सरकार चिनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर बंदी घालू शकते. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादामुळे भारत सरकार हे पाऊल उचलले जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत विमा बाजारात …
Read More »
Marathi e-Batmya