Tag Archives: monsoon session

फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद का टाळली? अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला पत्रकार परिषदेला दांडी

मुंबई: प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशाच्या पुर्वसंध्येला अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सौहार्दाचे वातावरण रहावे यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांसाठी चहापानाचा  कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देणे ही विधिमंडळ अधिवेशन काळातील परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली यंदाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चहापानाचा कार्यक्रम यावेळीही …

Read More »

ठाकरे सरकार दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ही ७ विधेयके मांडणार प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी

मुंबई: प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या ५ जुलै ते ६ जुलै २०२१ असे दोन दिवस सुरू राहणार असून या दोन दिवसात ५ विधेयके नव्याने या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर २ प्रलिंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या विधेयकांची यादी (1)     कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या …

Read More »

ओबीसींचा डेटा द्यायचा नाही हा तेव्हांच्या सरकारचा निर्णय; चेहरा उघडा पाडणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फक्त देशात नाही तर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असून २०११ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने सर्वे केला, तेव्हा त्यात ८ कोटी चुका असल्याचे निष्पन्न झाले. एकट्या महाराष्ट्रात ७० लाखावर चुका. त्यामुळे तेव्हाच्याच केंद्र सरकारने ही माहिती देऊ नये, असा निर्णय घेतला होता असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते …

Read More »

गोस्वामीच्या अडचणीत वाढ: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशी होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मागील अनेक महिन्यापासून अन्वय नाईक याच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने रिपब्लिक टिव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी हे कारणीभूत असल्याचा आरोप करत रिपब्लिक वृत्त …

Read More »

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची …

Read More »

अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती

नागपूर-मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न …

Read More »

मंत्र्यांसह सर्वांनी आधी कोरोनाचा टेस्ट रिपोर्ट दाखवा मगच विधानभवनात प्रवेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला सविस्तर आढावा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी ५ व ६ …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …

Read More »

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे तारीख पे ताऱीख ७ सप्टेंबरचा आता तिसऱ्यांदा मुहुर्त

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर दाटलेल्या कोरोनाच्या दाट छायेतून सुटका होताना दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन बदलत्या परिस्थितीनुसार जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला जुलै नंतर ऑगस्टच्या मुहूर्ताची प्रतिक्षा होती ती देखील आता मावळली …

Read More »