Tag Archives: navi mumbai municipal corporation

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागणार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले. नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगांराना वाढीव सानुग्रह अनुदान ४१० कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन

नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून २५ नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, १० बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा …

Read More »

बेलापूरात तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू दोन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले, ढिगाऱ्याखाली शोध घेण्याचे काम सुरु

बेलापूरातील सेक्टर १९ येथील शहाबाज गावात आज पहाटेच्या वेळी एक तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १ एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुर्दैवाने वेळीच मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य सुरु केल्याने दुपारपर्यंत ५५ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची …

Read More »

आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी ५० कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्ट संकेत, नवी मुंबईतील रहिवाशांना मिळणार मालमत्ता कर माफी नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, ठाणे तालुक्यातील ‘या’ १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील …

Read More »