Tag Archives: ncp

अजित पवारांना पडला प्रश्न म्हणाले सुधीर भाऊंना झालेय काय ? सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची मिश्कील सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली. विधानसभेत आज विरोधकांनी …

Read More »

ओबीसी- मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेची फडणवीसांनी केली पोलखोल चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी ओबीसी बहुल पाच जिल्ह्यात झालेल्या निवडणूकाच सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल केल्याने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्याची भूमिका मांडत आहे तर दुसऱ्याबाजूला ओबीसी आरक्षण प्रकरणात ५० टक्के मध्ये आरक्षण बसविण्याचे शपथ पत्र न्यायालयात सादर केल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचा …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या कोपरखळीने सभागृहात उडाला हास्यकल्लोळ फास्टॅग कोणाला लावायचा आमदारांना कि गाडीला?

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे गंभीर स्वरूपाचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. मात्र एखादा प्रसंग घडला किंवा कोणी त्यांची टोपी उडविली तर त्यास हसून दाद ही देतात. परंतु कधी स्वतः कोणाची खिल्ली किंवा टोपी उडविण्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र आज त्यांनी केलेल्या …

Read More »

अजित पवारांचे आदेश, कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नका विरोधकांच्या प्रश्नावर अजित पवार यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज मंडळाकडून वीज ग्राहक आणि कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज जोडणी तोडण्यासंदर्भात बजाविण्यात आलेल्या नोटीशीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत ग्राहकांची वीज तोडू नका असे आदेश वीज मंडळाच्या विभागाला दिले. शेतकऱ्यांचे कृषीपंप …

Read More »

ग्रामीण भागात बांधकाम करायचाय मग या प्रमाणपत्राची गरज नाही बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही-ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक …

Read More »

मंत्री राठोड आले, आता कारभारही संभाळतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी १५ दिवसानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी बैठकीत कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. राठोड आता विभागाच्या दैंनदिन कामकाजाला सुरुवात करतील असे नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्री राठोड यांच्यावरू सध्या विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारवेर धरले …

Read More »

गृहमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब, भाजपाचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच पोलिस तपासात आले सत्य समोर- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेल्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालु आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत …

Read More »

खा. सुप्रिया सुळेंचे आव्हान, एक फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ है ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही

नवी मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवारसाहेबांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने पवारसाहेबांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार साहेब म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत …

Read More »

विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ तारखेपासून पण…. एक आठवड्याचे कामकाज निश्चित त्यानंतर निर्णय पुढचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत होत असून पहिल्या आठवडाभराचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात पुढील कालावधीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Read More »

भाजपाने दिले बांग्लादेशी नागरीकाला संघटनेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश भारत तपासे यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलिस धाडीत समोर आली असून भाजपवर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी केली आहे. दरम्यान भाजपच्या बांग्लादेशी …

Read More »