मुंबईः प्रतिनिधी देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती …
Read More »भीमा कोरेगांवप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मंत्रालयात आंदोलन १८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक
मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांवसह चार गांवामध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे साधारणतः १८ कार्यकर्त्ये मंत्रालयात आले. त्यानंतर त्यांनी थेट …
Read More »भाजप नेत्यांच्या समृध्दीचा मार्ग म्हणजे समृध्दी महामार्ग राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी मुंबईला नागपूरला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असून हा महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत महामार्गाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम केलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना तेथेच नियुक्ती देत भ्रष्टाचार सुरु ठेवण्यासाठीच त्यांची नियुक्ती …
Read More »माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपला कोणताही मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला जात नसून विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील आदींकडूनही टीका करण्यात येते. मात्र माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा असून तो आतूनच येत असल्याचे प्रतिपादन विधान …
Read More »विधान परिषदेत तिसऱ्य़ा दिवशीही गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चार वेळा कामकाज तहकूब
नागपुर : प्रतिनिधी आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने …
Read More »हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांच्या नावाऐवजी सुप्रियांच्या नावावर एकमत
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासह विविध प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील पक्षाला हवे असलेले नवे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या रूपाने स्थापित करण्याचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी …
Read More »मदत न करणाऱ्या सरकारची कोणतीही बीले भरू नका जनआक्रोश मोर्चाच्या सभेत शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्याची घोषणा देत सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी तातडीने मदत करावीशी वाटत नाही. कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही त्यांच्याकडून अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. यांच्या हृदयाला पाझर कसा …
Read More »राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे), सपा, माकप सहभागी
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या प्रश्नावर कॉंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाची सुरुवात नागपूर येथील दिक्षाभूमीवरून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. या मोर्चात शेकाप, आरपीआय (कवाडे) गट, समाजवादी …
Read More »विरोधकांचा १२ डिसेंबरला विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नेतृत्व करणार
नागपूर : प्रतिनिधी सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०१७ रोजी विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री …
Read More »भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीनतेचा परिपाक म्हणजे पटोलेंचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी गुजरात निवडणूकांचा निकाल जाहीर व्हायच्या आधीच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. मात्र पटोले यांचा राजीनामा म्हणजे भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीन धोरणांचा परिपाक असून भाजपलाच हा घरचा आहेर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत …
Read More »
Marathi e-Batmya