Tag Archives: NIA

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निकालावर केला सवाल

२००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल केला. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट …

Read More »

मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरण: आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा तपास तपासाची दिशा आणि पुरावे जमा, साक्षिदार

हेमंत करकरे हे २००८ मध्ये महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील भिक्कू चौकात मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जखमी झाले. या स्फोटाने देशभर खळबळ उडवली, कारण तो रमजान आणि नवरात्रोत्सवाच्या काळात मुस्लिमबहुल भागात झाला होता. हेमंत करकरे यांच्या …

Read More »

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यास एनआयएने घेतले ताब्यात जम्मूमधील न्यायालयाने ताब्यात घेण्यास दिली परवानगी

जम्मूमधील एका न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) ताब्यात घेण्यास परवानगी दिली. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद पुरवल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक करण्यात आलेल्या दोन काश्मिरी पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पहलगामचे रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि बशीर …

Read More »

एनआयए करतेय तहव्वुर राणा ची मागील चार दिवसांपासून चौकशी आठ ते १० तास होतेय चौकशी-आवाजाचा सॅम्पल घेण्यात आला

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपास यंत्रणांकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हल्ल्यामागील एक मोठा कट उलगडला जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी (१४ एप्रिल २०२५) सांगितले. एनआयए NIA अधिकारी राणाच्या वैद्यकीय तपासणीची खात्री करत आहेत आणि …

Read More »

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या चौकशीसाठी स्पेशल १२ जणांना परवानगी एनआयए आणि मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्यांस परवानगी

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर भारतात आणले जात आहे आणि सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. राणाला घेऊन जाणारे एक विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी नवी दिल्लीत उतरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर राणाला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात येईल जिथे …

Read More »

एनआयएचे प्रतिज्ञापत्र, आनंद तेलतुंबडे यांच्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका मुंबई उच्च न्यायालयात एनआयएने दाखल केले प्रतिज्ञापत्र

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की दलित हक्क कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) (सीपीआय-एम) चे सक्रिय सदस्य आहेत आणि भारताच्या ‘सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला’ ‘धोका’ देणाऱ्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक कामांसाठी अॅमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममध्ये जाण्याची …

Read More »

प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची उच्च न्यायालयात याचिका राष्ट्रीय तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

एप्रिल आणि मे महिन्यात अध्यायनासाठी परदेशात जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपीपैकी एक प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी प्राथमिक झाली. त्यावेळी आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर राष्ट्रीय …

Read More »

६ वर्षानंतर न्यायालयाकडून अखेर रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना जामीन नजकीच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही

पुण्यातील एल्गार परिषद आणि भीमा कोरेगांव प्रकरणी कोणत्याही पुराव्याशिवाय अटक करण्यात आलेले संसोधक रोना विल्सन आणि सामाजिक कार्यकर्त्ये सुधीर ढवळे यांना एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. मात्र या दोघांच्या अटकेला ६ वर्षे झाली तरी अद्याप दोषारोप निश्चित करण्यात एनआयए अपयशी ठरल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाने संशोधक रोना …

Read More »

एल्गार परिषद प्रकरण: आरोपी सागर गोरखेला अंतरिम दिलासा विधी शाखेच्या पदवी परीक्षेसाठी जामीन मंजूर

एल्गार परिषद आणि भीमा गोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी सागर गोरखेला विधी शाखेच्या पदवी परीक्षेला बसण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. सागर गोरखे यांना १४ डिसेंबर ते ४ जानेवारी कालावधीसाठी विधी शाखेच्या पदवीच्या (एलएलबी) पहिल्या सत्राच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देताना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सागर गोरखेला २२ दिवसांसाठी …

Read More »

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना समन्स नाहीच एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर या रुग्णालयात दाखल असल्यामळे त्या त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. म्हणून त्यांना समन्स बजावता आले नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात माहिती देताना सांगितले. प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत खालावली असून मागील दोन महिन्यांपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे …

Read More »