मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. …
Read More »१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसकडून अभिनंदन! कोरोना रूग्णसंख्येत जगात तिसरा क्रमांक पटकावून मोदीनी भारताची किर्ती वाढविल्याची प्रवक्ते सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी सहा वर्षापूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले. केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला कोरोनाचे १५ लाख रूग्ण दिले …
Read More »आता मास्क, सॅनिटायजरची किंमत निश्चित होणार आरोग्य मंत्री टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील …
Read More »अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले. देशातील कोरोनाबाधीतांच्या …
Read More »चीनी अॅपवर बंदी घातली मात्र नमो अॅपचे काय? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी देशातील १३० कोटी लोकांचे खाजगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत चीनी ५९ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र ज्या नमो Namo अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती परदेशात पाठविली जाते. त्या अॅपवर बंदी कधी घालणार असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. …
Read More »अनलॉक-२ मध्ये प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्याने काही प्रमाणात आपण या विषाणूला रोखू शकलो. आता आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश केला आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहणार असल्याने येत्या नोव्हेंबर पर्यत देशातील ८० कोटी गरीब, गरजू, कामगार असलेल्या नागरिकांना महिन्याला प्रति व्यक्ती मोफत ५ किलो …
Read More »केंद्राकडूनही ३१ जुलैपर्यंत या नव्या सवलतींसह अनलॉक-२ जाहीर जून्या सवलतींसह नव्या सवलतींचा समावेश
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारपाठोपाठ केंद्रानेही ३१ जुलै पर्यंत अनलॉक-२ जाहीर केला आहे. या काळात खालीलप्रमाणे सवलती देण्यात आलेल्या आहेत. कंटेनमेंटच्या बाहेर- १) शाळा, कॉलेज, कोचिंग, शैक्षणिक संस्था ३१ जुलै पर्यंत बंद राहणार. पण ऑनलाईन-डिस्टन्स पध्दतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार. पण १५ जुलै २०२० पासून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य …
Read More »आर्थिक पाठबळ देण्याऐवजी मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकतय ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन!
मुंबई: प्रतिनिधी देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा …
Read More »काँग्रेसनेही विचारले आता पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न चीनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला दिला कोट्यवधींचा निधी : बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »पंतप्रधान मोदीजी, आता सर्वच अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोदींना पत्र
मुंबई: प्रतिनिधी राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात …
Read More »
Marathi e-Batmya