Tag Archives: police

बदलापूर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप; आंदोलक आपल्या मागणीवर ठाम मंत्री गिरीष महाजन, राज्य सरकारच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक

शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच बदलापूर स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळू नये या उद्देशाने पोलिसांनी माघार घेतली. त्यानंतर राज्य सरकारचे …

Read More »

दोन लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनेवरून बदलापूरकर आक्रमक; रेल रोको आंदोलन सकाळपासून सुरु झालेले आंदोलन संध्याकाळ होत आली तरी सुरुच

दोन लहान शाळकरी मुलींवर शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरून आज बदलापूरकर चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीवरून बदलापूर रहिवाशी आक्रमक झाले. सुरुवातीला आंदोलक जमावाने ज्या शाळेत हि घटना घडली, त्या शाळेसमोर आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. या घटनेमुळे …

Read More »

टिळक रूग्णालयाच्या महिला डॉक्टरला रूग्ण व नातेवाईकांकडून मारहाण हल्ल्यानंतर सर्वजण पळून गेले, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. या घटनेनंतर हल्लेखोर रुग्णालयातून पळून गेल्याने पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. …

Read More »

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »

“कोकेन” चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर अभिमन्यू सिंग पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे, त्याची पत्नी क्राईम थ्रिलरची निर्माती 

मॉम , सूर्यवंशी यासह अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अभिमन्यू सिंग आता दिग्दर्शक श्रावण तिवारीच्या जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट “कोकेन” मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे ज्यामध्ये अभिमन्यू सिंगच्या व्यक्तिरेखेची किनार दिसत आहे. या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे अभिमन्यू सिंगची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, … डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …

Read More »

चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त

सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, मराठ्यांची मुंबईकडे कूच….

राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील पुकारलेल्या आंदोलनाला राज्य सरकारने प्रतिसाद देत नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून फेब्रुवारी २०२४ पासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्या दरम्यान अंतरावली येथे बैठक झाली. …

Read More »

अंबादास दानवे यांची ग्वाही, तरूणीला मारहाण प्रकरण… अधिवेशनात लावून धरणार

ठाणे येथे एमएसआरडीसी व्यवस्थापकाच्या मुलाने तरुणीला मारहाण करून तिच्या अंगावर जाणीवपूर्वक गाडी घातली, त्यामुळे त्याच्या विरोधात आज रात्रीपर्यंत कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. तसेच पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, … बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने दबाव आहे का?

ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम …

Read More »