काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द …
Read More »राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी-वड्रा भडकल्या, तुमच्या चमच्यांनी…. अदानी संसदेपेक्षा आणि देशाच्या जनतेपेक्षा मोठा झाला का, प्रियंका गांधी यांचा सवाल
मोदी आडनावाचे सगळेच चोर का असतात? अशी टीका केल्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा काल गुरूवारी सुनावली. त्यानंतर आज तात्काळ लोकसभा सचिवांनी या निर्णयाची दखल घेत राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जारी केला. या निर्णयावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी थेट …
Read More »तो कोणता कायदा आहे? ज्यामुळे राहुल गांधी यांना गमवावी लागली खासदारकी खासदारकी रद्द करण्याच्या आदेशातच राहुल गांधी यांचा माजी खासदार म्हणून उल्लेख
मोदी आडनावाचे सगळे चोर का असतात? अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ साली कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान केली. याप्रकरणी गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांनी दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. मात्र न्यायालयाच्या निकालाविरोधात अपिल करण्यासाठी एक महिन्यासाठी जामीन मंजूर …
Read More »मोदी सरकार घाबरले म्हणूनच ती कारवाई, नाना पटोले यांचा निशाणा कुठे? भाजपा सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर जेल भरो आंदोलन
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले …
Read More »बाळासाहेब थोरातांचा पलटवार,…त्याच गावच्या बाभळी असतात’ हे सत्ताधा-यांनी लक्षात ठेवावे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन हे सत्ताधाऱ्यांचे हीन राजकारण
खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतक-यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या …
Read More »अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल… ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय... ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये
विधिमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय… ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार …
Read More »राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित
अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे …
Read More »न्यायालयाने विचारताच राहुल गांधींची स्पष्टोक्ती, मी बोलतो पण… प्रियंका गांधी-वड्रांचा मोदी सरकारवर निशाणा
गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा यात्रेच्या निमित्ताने कोलर येथील प्रसारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. …
Read More »नाना पटोलेंची टीका, त्यामुळे घाबरलेले पंतप्रधान मोदी पोलिसांना पुढे करतायत… काँग्रेस पक्ष अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच
उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुल गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महाघोटाळ्या विरोधात …
Read More »राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल …
Read More »
Marathi e-Batmya