Breaking News

Tag Archives: relief fund

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. तसेच खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या …

Read More »

दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींच्या निधी वितरणास मान्यता

नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रित कारभाराचे पाप नागपुरातील पूर नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रीत आणि गलथान कारभाराचे पाप

नागपूर शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठले व पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपूरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच …

Read More »

आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या या ११ मोठ्या घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाच्या माध्यमातून दिली माहिती

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात केला. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, …

Read More »

विजय वडेट्टीवारांची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी केली मोठी घोषणा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना चार लाखांपर्यंत मदत

मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार यापुढे एसडीआरएफ खाली करण्यात येणार असून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत असल्याचे …

Read More »