Tag Archives: sanjay raut

उध्दव ठाकरे यांना सांगितले, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही संजय राऊत यांच्या भेटीवरून पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली भूमिका

नुकतेच शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रहायचे तर मनाने नाही तर नाही असे सांगत मी त्यावेळीच सांगितले माझा दरवाजा उघडा आहे. जायचं तर खुशाल जा आणि रहायचे असेल तर रहा. माझ्यासोबत असलेल्या निष्ठावंतांचा अभिमान असल्याचे ही स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी त्यांचे निष्ठावंत आणि विश्वासू असलेले …

Read More »

राऊत कोठडीत गेल्यानंतर सर्वानाच एक प्रश्न, ईडी कोठडीत काय करत असतील? नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या मिटींगा

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऐरवी त्यांचा दिवस राजकिय घडामोडी आणि वक्तव्यात जातो. मात्र संजय राऊत यांना तुरूंगात गेल्यानंतर त्यांचा दिवस कसा जात असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आपच्या मराठी ई-बातम्या.कॉमच्या प्रतिनिधीने याविषयीचा कानोसा घेतला असता संजय राऊत …

Read More »

मेधा सोमय्यांची न्यायालयात मागणी; ईडीला सांगा, राऊतांना जबाब देण्यासाठी हजर करा मानहानी याचिकेवरील सुनावणीवेळी केली मागणी

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या ईडी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे आज शिवडी न्यायालयात हजर होवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा जबाब घेण्यासाठी ईडीला आदेश देवून त्यांना शिवडी न्यायालयात आणून जबाब घ्यावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली. काही …

Read More »

ईडी कारवाईनंतर संजय राऊत यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र, वाचा पत्र ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र

पत्रावाला चाळप्रकरणी ईडीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने कारवाई करत अटक केली. तसेच त्यांना विशेष न्यायालयानेही दुसऱ्यांदा ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ईडी कोठडीतूनच संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिल्याची माहिती पुढे आली आहे. या पत्रात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी काँग्रेस …

Read More »

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून छगन भुजबळ म्हणाले, लवकर जामीन… नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याची माहिती नाही

शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या विरोधात ईडीकडून लक्ष्य करत कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकतीच संजय राऊत यांची पत्रावाला चाळ प्रकरणी चौकशी करत मध्यरात्रीनंतर अटक केली. त्या पाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठविल्याचे सांगितले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राऊत कुटुंबियांना सूचक इशारा दिला. संजय राऊत …

Read More »

संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी; वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

तीन दिवसांपूर्वी पत्रावाला चाळ प्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मैत्री आणि रिसिडन्स गार्डन या दोन बंगल्यावर ईडीने धाडी टाकत ११ लाख रूपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर संजय राऊत यांची ईडीने रात्री उशीरापर्यत चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली.अटके नंतर संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयात …

Read More »

संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार बोलले नाहीत म्हणजे संजय राऊत यांचा… संजय राऊत यांच्या अटकेनंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य

पत्रावाला चाळप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून …

Read More »

उध्दव ठाकरे यांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर, पण ते आता गुलाम… राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम कोण ?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले, भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली असे खोचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला …

Read More »

संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई

गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत …

Read More »

ईडी कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत म्हणाले, शरण जाणार नाही… शिंदे गटाला टोला लगावत महाराष्ट्र कमकुवत होतोय पेढे वाटा

ईडीने दोन वेळा नोटीस बजाविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडीने आज रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी धाड टाकत तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेत ईडी कार्यालयाकडे नेले. त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले, कितीही कारवाई करा …

Read More »