नागपूरः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला वैद्यकीय शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून निवेदन सादर केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 द्वारे राज्यातील सामाजिक व आर्थिक मागास समाज प्रवर्गास आरक्षण …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप करण्यात आले. मंत्र्यांना खातेवाटपाची यादी मंजूरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकेड पाठविण्यात आली होती. त्यांच्या मंजूरीनंतर यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली. या खाते वाटपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सांसदीय राजकारणात …
Read More »शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रू.ची रक्कम डिपॉझिट ठेवणार आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी - शरद पवार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मान जगता यावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्यांसाठी दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० …
Read More »मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या ६ मजल्यावर फक्त मुख्यमंत्रीच पवार, खडसे, डॉ.बोंडेमुळे मविआचे मंत्री म्हणतात ६ मजला नको
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला …
Read More »केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …
Read More »आरे, नाणारला विरोध करणारी शिवसेना रत्नागिरीत पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी आग्रही रोजगार देणारी तीन हजार एकर जमिन बड्या उद्योजकाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील
मुंबईः खास प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण आणि कोकणाच्या विकासाच्या नावाखाली उध्दवस्त करणारे नाणार, जैतापूर प्रकल्प आणि मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीतील एका उद्योजकाच्या व्यवसायवृध्दीसाठी तीन हजार एकर बागायती आणि पर्यावरणाखाली असलेली जमिन उजाड करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच मराठीe-बातम्या.कॉमच्या हाती आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीच जैतापुर …
Read More »पाच वर्षातल्या ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा असल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. भाजप-शिवसेना …
Read More »कंत्राटी कामगारही भूमीपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या निकषात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यात भूमीपुत्रांना न्याय देण्याच्या प्रयत्नांत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा निकष लागू होईल, असा प्रयत्न करण्यात येत असून यासाठी गरज भासल्यास कायदा करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात १९६८ सालापसूनच उद्योगांमध्ये भूमीपुत्रांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा कायदा केला. त्यानंतर त्यात …
Read More »स्टील उद्योग उभारणीसाठी रशिया आठशे कोटींची गुंतवणूक करणार स्टिल कंपनीला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. तसेच या उद्योगाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी …
Read More »अखेर नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात ४० गावांच्या ग्रामस्थांची पसंती
मुंबईः प्रतिनिधी बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावातील जमिन अधिग्रहण करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya