मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, …
Read More »शासकीय जागेवर जाहिरात फलकांसाठी ई-लिलाव महसूल वाढीसाठी शासनाचा निर्णय
राज्यातील शासनाच्या जागांवर जाहिरात फलक लावण्यासाठी ई- लिलाव प्रक्रिया राबविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पाच वर्षासाठी या जागा वापरासाठी दिल्या जातील. प्रति निविदा प्रक्रिया पाच हजार रुपयांचे शुल्क याकरिता आकारले जाईल. तर महापालिका क्षेत्रातील जमिनीच्या बाजारभावानुसार ३ पट तर जिल्हा किंवा राष्ट्रीय महामार्गाकरिता ५ पट दर आकारला जाणार आहे. महसूल …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अभ्युदय नगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका निविदा प्रक्रियेला गती देण्याचे आदेश
मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्या उद्योजगांना विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा
राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत “गती शक्ती” प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »धारावी पुर्नविकास प्रकल्प प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात सेकलिंकने दिले आव्हान
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीजला देण्यात आलेल्या निविदा कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सेकलिंक टेक्नॉलॉजीजच्या याचिकेत आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली. सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (याचिकाकर्ता) च्या बाजूने धारावी झोपडपट्टी पुनर्विकास निविदा रद्द करून ती अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला पुन्हा जारी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना धक्काः या कामाला दिली स्थगिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील ३२०० कोटी रूपयांच्या कामाला दिली स्थगिती
माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य विभागाचा कारभार तानाजी …
Read More »अनिल परब यांचा आरोप, बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत ९० कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू असतानाही घोटाळा
बीएमसीमधील उघड भ्रष्टाचाराच्या आणखी एक उदाहरण समोर आले असून त्यात बीएमसीने प्रतिबंधात्मक पद्धती आणि निवडक अटी वापरून मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत फेरफार केल्यामुळे बीएमसीचे ९० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर एसआयटीकडून चौकशी सुरु असताना हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी आज …
Read More »नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …
Read More »राज्य यंत्रमाग महामंडळाचे स्पष्टीकरणः कापूस पिशव्यांची खरेदी दुपट्ट नव्हे तर सरकारी दराने राजकिय नेत्यांचा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांकडून वस्त्रोद्योग बाबींचा पुरवठा करण्यात येतो. सदर संस्थांनी उत्पादीत केलेल्या वस्त्रोद्योग बाबींचे विपणन करण्याची जबाबदारी आहे. या वस्तूंचे दर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसारच असल्याचा खुलासा वस्त्रोद्योग महामंडळाने एका पत्रकान्वये केला आहे. वस्त्रोद्योग महामंडळाने ई-निविदाद्वारे कापूस साठवणूक बॅग पुरवठयाबाबत नोंदणीकृत संस्थांचे …
Read More »
Marathi e-Batmya