ठाणे महानगरपालिकेत गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट तीन वर्षांवर आणण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले. सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. ठाणे महापालिकेमध्ये गट ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या …
Read More »कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रीम तलावाच्या अनुषंगाने वाढती नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत …
Read More »ठाणे महापालिका आयुक्तांच्या प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान सिद्धेश्वर तलावाभोवतालच्या उद्यानासाठीच्या भूखंडाचे आरक्षण बदलले
ठाण्यातील प्राचीन सिद्धेश्वर तलावाभोवतालच्या उद्यानासाठीच्या भूखंडाचे आरक्षण निवासी क्षेत्रात रूपांतर करण्यात आले असून ठाणे महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात तसा बदल केल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच, आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याला आणि ही नियुक्ती घटनाबाह्य असल्यामुळे रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात …
Read More »हायब्रिड स्किल विद्यापीठ म्हणजे काय रे भाऊ, राज्य मंत्रिमंडळाची तर मान्यता
राज्यात मोठ्या तोऱ्यात हायब्रिड स्किल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस-पवार यांच्या राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. तसेच त्यासाठी महाप्रीत या आणखी एका संस्थेची स्थापना करत महाप्रीतच्या माध्यमातून या विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. मात्र यासंदर्भात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या …
Read More »आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही दोन दिवसात अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करणार
ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा-कोपर येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… की गरीब माणसं फक्त मरण्यासाठी जन्माला येतात? छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल
कोपर-कळवा रुग्णालयात कालपासून तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच मनसे नेते अभिजित जाधव व ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र …
Read More »शरद पवार यांची ठाणे महापालिका हॉस्पीटल प्रशासनाला कानपिचक्या ५ मृत्यूच्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग न येणं दुर्दैवी
ठाणे शहर हे तसे पाह्यला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणती विकास कामे व्हावी आणि कोणती प्रलंबित ठेवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनेच होत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेवरही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचीच सत्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी येथील महापालिका रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू …
Read More »ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित
उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे कल्पिता पिंपळे यांनी केली ही मागणी चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
ठाणे : प्रतिनिधी अनधिकृत फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सध्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन केला, त्यावेळी कल्पिता पिंपळे यांनी हल्लेखोरास कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ताई, तुमच्या बहादुरीचे …
Read More »संपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे
क्लस्टरचा रिडेव्हलेपमेंट अर्थात समुह पुर्नविकासाचे धोरण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. समुह पुर्नविकासासंतर्गत जुन्या मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा एकत्रितरित्या पुर्नविकास करणे सहजशक्य होणार आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगले हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क असून ठाणेकरांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य शासनाने आणि राज्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya