राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या …
Read More »भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना, राज्यात इनोव्हेशन हब विकसित करा अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित
राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण …
Read More »उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचना इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण द्या
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारी अर्ज कसे भरावेत, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी सुचना उच्च न्यायलयाने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीचे नामांकन अर्ज कसे भरायचे याबद्दल इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, अर्ज कसा भरावा, त्याबाबत जागरूकता निर्माण …
Read More »पूजा खेडकर प्रकरणी नवे वळणः प्रशिक्षण राज्य सरकारने थांबविले मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राकडून सरकारला आदेश
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ८३७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होत आयएएस पदासाठी निवड झालेल्या पूजा खेडकर हीची प्रशिक्षण कालावधीतच कारकिर्द वादग्रस्त बनली असून पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अखेर केंद्र सरकारच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राच्या आदेशान्वये राज्य सरकारने तिची जिल्हा प्रशासनाचे प्रशिक्षण थांबविण्याचे आदेश आज पारीत केले. पूजा …
Read More »भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन सीडीएस परिक्षेची पर्वतयारी नाशिकमध्ये
कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६३ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात …
Read More »बार्टीसाठी केंद्रीय मंत्री आठवले, शिंदे गटाच्या तीन आमदारांसह ४ जणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बार्टीचे प्रशिक्षण पूर्ववत सुरु करा
राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत देण्यात येणारे भरतीपूर्व प्रशिक्षण बंद केल्यामुळे समाजात नाराजीची भावना असून हे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरु करून विद्यार्थाना न्याय देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya