राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश, सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृहे बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश
राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या …
Read More »ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक
लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये या तिसऱ्या …
Read More »पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नियम निश्चित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत. ‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले …
Read More »तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …
Read More »२५२ तृतीयपंथीयांना घरे मिळणार घरे
नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी …
Read More »तृतीयपंथीयांना ओळखपत्र रेशनकार्ड आणि स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल देणार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांचे आश्वासन
तृतीयपंथीय घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी व या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी प्रादेशिक सल्ला मसलत करणे आणि स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत भांगे बोलत …
Read More »तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे
तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …
Read More »आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ? स्नेहालय संस्थेकडून देणगीसाठी आवाहन
अहमदनगर, दिनांक ३० मार्च २०२०: कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. …
Read More »
Marathi e-Batmya