उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. उर्वरित एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी संबंधित …
Read More »राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; १२० पर्यटकांशी संवाद राज्यातील ३१ पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी …
Read More »उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत …
Read More »उत्तराखंड मध्ये मानसी देवी मंदिरात चेंगराचेंगरीः आठ जणांचा मृत्यू मृतांमध्ये १२ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश, तर ३० जण जखमी
रविवार (२७ जुलै २०२५) सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिराच्या पायऱ्यांच्या मार्गावर मोठी गर्दी जमली होती आणि वीज तार तुटल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील …
Read More »केदारनाथ मंदिराजवळ हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू गुजरातमधील विमान अपघातानंतर आता उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात
रविवारी (१५ जून २०२५) पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये सर्व सात जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये सुमारे ४० दिवसांत हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण करत होते. मात्र हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बद्री-केदार मंदिर समितीचे प्रमुख हेमंत द्विवेदी यांनी …
Read More »उत्तराखंड हिमस्खलनात आणखी ३ जणांचे मृतदेह सापडलेः एक जण अद्याप बेपत्ता मृतांची संख्या आठवरः घटनास्थळी एकूण ५४ कामगार
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात आणखी तीन मृतदेह सापडले आहेत आणि एक कामगार अजूनही बेपत्ता आहे, असे लष्कराने रविवारी सांगितले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हिमस्खलन झाले तेव्हा घटनास्थळी ५४ कामगार होते. लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले, “शेवटच्या माणसाचा शोध …
Read More »उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …
Read More »उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहिर
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी २६ प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून घसरले आणि बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील अलकनंदा नदीच्या काठावर सुमारे २५० मीटर घसरले. बचावकार्य सुरू करण्यात आले …
Read More »उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका नितीन गडकरी यांनी मानले सर्व टीमचे आभार
देशातील उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील डोंगराळ भागातील सर्वात मोठ्या उत्तरकाशी (डोंगर पोखरून) बोगद्याचे काम सुरु असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले होते. जवळपास आठवडाभरानंतर या अडकलेल्या ४१ आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात विविध यंत्रणांच्या मदतीमुळे यश आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी …
Read More »उत्तरकाशी बोगद्यात अद्यापही ४१ कामगार अडकलेलेच
उत्तराखंड येथील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शर्तीचे प्रयत्न करूनही अद्याप ४१ जण अडकल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तणावग्रस्त अशा ऑस्ट्रेलियातील तज्ञांना पाचारण केले. तसेच या बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुलबे यांची …
Read More »
Marathi e-Batmya