महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा आरोप, काँग्रेसने मराठा समाजाचा विश्वासघात केला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरून केला आरोप
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक असलेल्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारवर सातत्याने टीका करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसला दिला. मनोज …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी
कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी सुरू असल्याची आमची माहिती आहे. या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला कोणाचा आशिर्वाद आहे असा संतप्त सवाल करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत याबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते …
Read More »मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा
जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर विजय वडेट्टीवार केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका
राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. असे असताना राज्यातील शेतकरी संकटात मरतोय तर राज्याचे कृषी मंत्री परदेशात फिरतायत अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ
पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »रमेश चेन्नीथला यांची मागणी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा
घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे …
Read More »विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….
कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल …
Read More »
Marathi e-Batmya