Tag Archives: yashomati thakur

अनाथांना आरक्षणासह या महत्वाच्या प्रश्नी राज्य मत्रिमंडळाने घेतले हे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली बैठक

मुंबई: प्रतिनिधी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देताना याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह उलपब्ध करण्याच्या धोरणातही बदल करत दुय्यम आणि मुद्रांक निरिक्षक पदे लोकसेवा आयोगा मार्फत भरण्याच्या निर्णयासह काही महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. ते निर्णय …

Read More »

अत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय अशी तिची अवस्था.. मात्र या अवस्थेवर, यातनावर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क ९७ टक्के गुण मिळवले, या यशाचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. …

Read More »

भाजपाचे ‘जेलभरो आंदोलन’ म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर जिल्हा स्तरावर टास्क फोर्स-महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोवीड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. …

Read More »

महिला वन अधिकारी आत्महत्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन २५ मार्च, …

Read More »

या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ८ दिवसांचा लॉकडाऊन नाशिक, अमरावती, अकोला, वर्ध्याचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढील आठ दिवस नाशिक मध्ये लॉकडाऊन आज जाहिर केला. याकाळात नाशिकमधील सर्व शाळा, कॉलेज-महाविद्यालये आणि दुकाने बंद राहणार असल्याचे सांगत या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात …

Read More »

… पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहतायत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतक-यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

घर कामगार महिलांच्या कल्याणासाठी सूचना मागविणार घरकामगार महिलांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक - ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी असंघटित क्षेत्रामध्ये घर कामगार महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या कल्याणासाठी घरकामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे, अशी सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडली. यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगून घर कामगार महिलांच्या कल्याणासाठी योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्रात …

Read More »

महिला व बालविकास विभागात कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य ॲड. यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्या संवेदनशीलतेमुळे अनाथांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे …

Read More »

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबरः दोन हजार रुपयांची दिवाळी भाऊबीजेची भेट महिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि …

Read More »