Tag Archives: yogi adityanath

अयोध्येतील दिवाळीच्या दिपोत्सवाची दोन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रमाणपत्रे

भगवान रामाचे शहर अयोध्या, मातीच्या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने उजळले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला, रविवारी छोटी दिवाळीनिमित्त २६ लाखांहून अधिक दिव्यांच्या नदीत पवित्र शहराला स्नान घालून आणि या प्रक्रियेत दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रमाणपत्रे मिळाली. हा विक्रम अयोध्येतील सरयू नदीच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री योगींनी माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट …

Read More »

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नदीत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? अन्न मिळते का ? अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीत केले स्थान

नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला. मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना …

Read More »

अशोक गेहलोत यांचा सवाल, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ सारख्या घोषणांवर कारवाई का नाही? मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा

भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अजेंडा कोण करतंय सेट, भाजपा-महायुती की मविआ? विधानसभा निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा होतोय सेट

साधारणतः २००९ सालापासून राज्यातील विधानसभा निवडणूका असतील किंवा लोकसभेच्या निवडणूका असतील परंतु आतापर्यंत राज्यातील निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र २०१९ आणि २०३४ निवडणूकीत राज्यातील विरोधक थोडे भानावर येत निवडणूक कोणतेही असो पण भाजपाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची नाही असा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाने …

Read More »

मुंबई उपनगरातील महिलेची धमकी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या अन्यथा…. पोलिसांकडून महिलेला उल्हासनगरातून घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी एका २४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. महाराष्ट्र मुंबईतील उल्हासनगर भागातील फातिमा खान असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडे माहिती तंत्रज्ञानाची पदवी आहे, परंतु ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, असे मुंबई पोलिसांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली. उत्तर प्रदेशचे …

Read More »

हाथरसप्रकरणी राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र हाथरस घटनेवरून लिहिले पत्र दोषींवर कडक कारवाई करा

नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका बुवाच्या सत्संग कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर उडालेल्या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे जवळपास १२० नागरिकांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुंटुबियांना मदत निधीही जाहिर करण्यात आली. तसेच जखमींना उपचार करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, राम मंदिराचे निमंत्रण नाकारून अपमान…

लोकसभा निवडणूकी निमित्त उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे भाजपाच्यावतीने आज ९ एप्रिल रोजी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजपाचे अनेक उमेदवार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दंडाला धरून समोरून जाण्यास सांगितले, त्या घटनेची. …

Read More »