नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका बुवाच्या सत्संग कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर उडालेल्या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे जवळपास १२० नागरिकांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुंटुबियांना मदत निधीही जाहिर करण्यात आली. तसेच जखमींना उपचार करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिल्याची माहिती राहुल गांधी यांनी एक्स वरून दिली.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, हाथरसमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील मृत व्यक्ती आणि जखमींच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबियांना भेटल्यानंतर त्यांना दिलासा देण्यासाठी वापरण्यात आलेले सांत्वनपर शब्दही कमी पडत होते. इतके ते नागरिक दुःखी आणि कष्टी झाल्याचे पाह्यला मिळत होते, अशी भावनाही यावेळी व्यक्त केले.
राहुल गांधी पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्य सरकारने यापूर्वीच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत जाहिर केली. तर जखमींवरील उपचाराची जबाबदारीही घेतली आहे. मात्र मृतकांच्या कुटुंबियांना जाहिर करण्यात आलेली रक्कम अत्यंत तोकडी असून त्यात आणखी वाढ करण्याची गरज आहे. तसेच जखमींवर चांगल्यातील चांगले रूग्णालयात उपचार मिळतील त्या अनुषंगाने आणखी प्रयत्न करावेत अशी सूचनाही यावेळी केली.
त्याचबरोबर राहुल गांधी पुढे म्हणाले की, हाथरसमधील घटना दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. त्यामुळे पुन्हा अशा स्वरूपाच्या घटना घडू नये यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याची सूचना करत अशा प्रकारच्या गर्दीच्या घटनांना जबाबदार असणाऱ्या स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही करावाई करावी अशी मागणी करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठविलेल्या पत्रातून केली.
हाथरस में भगदड़ हादसे से प्रभावित पीड़ित परिवारों से मुलाकात कर, उनका दुख महसूस कर और समस्याएं जान कर उत्तर प्रदेश के माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी को पत्र के माध्यम से उनसे अवगत कराया।
मुख्यमंत्री जी से मुआवजे की राशि को बढ़ाकर शोकाकुल परिवारों को जल्द से जल्द प्रदान… pic.twitter.com/omrwp3QGNP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 7, 2024
Marathi e-Batmya