प्रियंका गांधी यांनी सांगितला स्व. इंदिरा गांधी यांचा “तो” धाडसाचा किस्सा मात्र आवडत्या राजकारणी आहेत न्युझीलंडच्या पंतप्रधान

मराठी ई-बातम्या टीम

काँग्रेसच्या पक्षातंर्गत राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरीने प्रियंका गांधी-वड्रा यांही सक्रिय झालेल्या आहेत. मात्र त्यांनी आज पहिल्यांदाच सोशल मिडियातून त्यांनी देशभरातील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक आठवण सांगण्याची विनंती केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्या धाडसाचा किस्सा सांगितला.

प्रश्नकर्त्या महिलेने प्रियंका गांधी यांना इंदिरा गांधी यांच्याबाबत एखादी खास आठवण सांगण्याची विनंती केली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, एके ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या मंचावर भाषण करण्यासाठी उभ्या राहील्यानंतर असताना गर्दीतून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. त्या दगडफेकीतील एक दगड त्यांच्या नाकावर बसला आणि त्या खाली पडल्या. परंतु त्या घाबरल्या नाहीत. त्या परत उठून उभ्या राहील्या आणि त्यांनी पुन्हा भाषण करायला उभ्या राहील्या. त्या जखमी झाल्या होत्या. परंतु त्या घाबरल्या नाहीत. त्या तशाच उभ्या राहील्या आणि भाषण पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून सुरक्षितस्थळी घेवून गेले.

त्यांना माहीत होतं की, काही निर्णय हे कठोर असले तरी ते घ्यावे लागणार आहेत. आणि त्यांनी ते निर्णय घेतले. त्या एकाबाजूला निडर, धाडसी होत्या. परंतु त्या दुसऱ्याबाजूला फारच प्रेमळ आणि दया असलेल्या होत्या. त्या आमच्याशी लहान बनून खेळत होत्या त्याची एक आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दुसऱ्या एका महिलेने आवडत्या राजकारणी कोण असा प्रश्न प्रियंका गांधी यांना विचारला असता त्यांनी काही काळ विचार करून म्हणाल्या की, माझी आवडती राजकारणी न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा अर्देन, या आहेत. त्या एक स्त्री असूनही त्या जनतेशी जोडलेल्या आहेत, धाडसी आहेत. त्यांची धोरणेही मला आवडतात. सोशल मिडियावर अॅक्टीव्ह आहेत. माझी आजी इंदिरा गांधी या माझ्या प्रेरणास्थान आहेत.

त्याचबरोबर त्यांनी आता मुलं मोठी झाली आहेत. ते ही त्यांची कामे आता स्वत: करत आहेत. पूर्वी मी पूर्णपणे घर आणि संसार या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे मुलांचे संगोपन आदींवर लक्ष केंद्रीय केले.

About Editor

Check Also

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *