राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

१७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जना व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 १९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

About Editor

Check Also

८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे

जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *