राहुल गांधी यांचा आरोप, …लस बनविणाऱ्या सिरम कंपनीकडून मोदींना कोट्यावधीचा…

नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी
भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले की, इलेक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठो खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात. शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का ? महाराष्ट्र, गोवा राज्यातील सरकार पाडण्यात याच इलोक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले पण या सोहळ्याला आदिवासी, दलित, मागास, गरिब समाजातील कोणालाही बोलावले नाही. नरेंद्र मोदी, मोहन भागवत, फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू, अंबानी, अदानी असे मोजक्या लोकांनाच निमंत्रित केले होते. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उग्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे असेही सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *