Breaking News

नारायण राणे यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील

भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणा-या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यावर मंगळवारी घणाघात केला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. राजकीय उंची आणि बौद्धीक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल असा इशारा ही नारायण राणे यांनी विरोधकांना दिला.

नारायण राणे म्हणाले की, अब की बार भाजपा तडीपार म्हणणा-यांनी स्वत:ची लायकी तपासून पहावी. कोरोना काळात गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणा-यांना सूज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील. मोदी सरकारवर मॅच फिक्सिंग चा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक, भ्रष्ट नेत्यांच्या समर्थनासाठी एकत्र येतात ही संतापजनक बाब आहे. तपास यंत्रणांच्या धाडी दरम्यान अव्वाच्या सव्वा रोकड मिळत असताना, अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणा-या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. लोकशाही तत्वांनुसार कायद्याचे पालन करत सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील असा विश्वासही व्यक्त केला. मोदींच्या कार्यकाळातील देशाची होणारी प्रगती विरोधकांना सहन होत नसल्यानेच जळफळाटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर बिनबुडाची टीका होत आहे असे प्रत्युत्तरही दिले.

नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, यांनी देशाच्या प्रगतीचे द्योतक असलेली अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची तुफान वेगाने घोडदौड सुरू असून यंदा ‘अब की बार , ४०० पार’ चे उद्दीष्ट एनडीए नक्की साध्य करेल असा विश्वास व्यक्त केला.

 

Check Also

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *