Breaking News

राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून भाजपाचा गोंधळ, काँग्रेसचा पलटवार भारत विरोधी मते बाळगणाऱ्या महिला सिनेट मेंमर इल्हान ओमर हीची घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून राहुल गांधी यांनी वादग्रस्त अमेरिकन महिला सिनेट मेंबर्स असलेल्या इल्हान उमर यांना भेटल्याबद्दल भाजपा नेत्यांकडून या भेटीवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा अमेरिकेचा असला तरी त्याचे पडसादर भारतात उमटत आहेत.

सिनेट काँग्रेसच्या सदस्या इल्हान ओमर या भारत विरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जातात. भारताविषयी असलेल्या विचारांचा विचार करताना काही भागांमध्ये तिच्यावर वैचारिक पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही करण्यात येतो. राहुल गांधी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यात मंगळवारी भेटलेल्या अनेक अमेरिकन खासदारांमध्ये त्याही होत्या.

या भेटीवरून भारतातील भाजपा नेत्यांकडून टीकेची झोड उठली. बुधवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, राहुल गांधी हे भारतविरोधी विष पसरवण्यासाठी ओळखले जातात, परंतु यावेळी त्यांनी जे केले ते चिंताजनक आहे. अमेरिकेला भेटणारे ते पहिले विरोधी पक्षनेते ठरले. खासदार इल्हान, जे भारतविरोधी भूमिकेसाठी प्रसिध्द असलेल्या इल्हान ओमर यांची भेट घेतली.

पुढे बोलताना सुंधाशू त्रिवेदी म्हणाले की, त्याने आपल्या भारतविरोधी मित्रांच्या यादीत आणखी एक नाव जोडले आहे. राहुल गांधी बालिशपणाने वागत नाहीत, तर धोकादायकपणे वागत आहेत अशी खोचक टीका करत राहुल गांधी हे भारत विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आवडेल असेच वागत आहेत असा आरोपही केला.

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला देखील राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राहुल गांधींना इल्हान ओमरला का भेटावे लागले? ते प्रत्येक परदेश दौऱ्यावर अत्यंत कट्टर भारतविरोधी घटकांशी का गुंतले आहेत? भाजपामध्ये – देश विरोध ठीक आहे ? असा कुत्सित टोलाही यावेळी लगावला.

काँग्रेसचा भाजपावर पलटवार

काँग्रेसने या भेटीबाबत बोलताना स्पष्ट केले की, इल्हान ओमर हे राहुल गांधींना भेटलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाच्या भाग होत्या.
यासंदर्भात काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजपाच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांनी आज पहिल्यांदा इल्हान उमरचे नाव ऐकले की काय . ती एक काँग्रेस सिनेट सदस्य महिला आहे आणि शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून आली असे सांगितले.

शीख समुदायावर गांधी वंशजांच्या टिप्पणीबद्दल बोलताना पवन खेरा म्हणाले की, राहुल गांधी यांनी शीखांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. देशात द्वेष कसा आहे, एका वृद्धाला ट्रेनमध्ये कसे मारहाण करण्यात आली, मुस्लिम असल्याच्या संशयावरून एका मुलाची कशी हत्या झाली… असे विविध समुदायांचे प्रश्न त्यांनी वारंवार मांडले आहेत.

त्यानंतर मणिपूरमधील हिंसाचारावरून पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी सोशल मीडियातून बाहेर पडून जमिनीवर यावे… त्यांनी मणिपूरला देशाचा भाग मानतो की नाही, ते मणिपूरला भेट देणार की नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल खोचक टोलाही यावेळी लगावला.

मंगळवारी, राहुल गांधींनी वॉशिंग्टनमधील रेबर्न हाऊस ऑफिस बिल्डिंगमध्ये काँग्रेस सिनेटचे सदस्य ब्रॅडली जेम्स शर्मन यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अनेक अमेरिकन खासदारांची भेट घेतली. यावेळी प्रतिनिधींमध्ये, जोनाथन जॅक्सन, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, बार्बरा ली, ठाणेदार, जेस जी ‘चुय’ गार्का, इल्हान ओमर, हँक जॉन्सन आणि जॅन शाकोव्स्की यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत