Breaking News

न्यायालयाच्या शिक्षेवर संजय राऊत म्हणाले, न्यायपालिकेचे संघीकरण झालेय… वरच्या न्यायालयात दाद मागणार

शौचालय बांधणीत घोटाळा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सौमय्या यांच्या नावे असलेल्या एनजीओ असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी किरीट आणि मेधा सौमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा शिवडी न्यायालयात दाखल केला. त्यावर शिवडी न्यायालयाने निकाल देताना संजय राऊत यांना १५ दिवसाची कैद आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. दरम्यान एक तासाच्या अंतराने संजय राऊत यांना १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, देशातील संपूर्ण न्यायापालिकेचे वरून ते खालपर्यंत संघीकरण झाले आहे. या देशात काहीही होऊ शकते. देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला जाऊ शकतात तेथे न्यायापालिकेकडून काय अपेक्षा करू शकतो, पण माझा न्यायपालिकेवर विश्वास असल्याचे सांगत याप्रश्नी आपण वरच्या न्यायालयात जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचा सहभाग असलेल्या एनजीओने शौचालय बांधकामात १०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा सर्वात पहिला आरोप पश्चिम उपनगरातील एका महानगरपालिकेतील शंकर पाटील यांनी पत्र लिहून तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यासंदर्भात आता भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या प्रताप सरनाईक यांनीही या पत्राच्या आधारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून या शौचालय बांधकाम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच विधानसभेतही अधिवेशन काळात या प्रश्नी चर्चा करण्यात आली. त्यावर राज्य सरकारने विधानसभेत उत्तर दिले की, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई कऱण्याचे आदेश दिले असल्याची प्रतही यावेळी संजय राऊत यांनी दाखविली.

शेवटी बोलताना संजय राऊत म्हणाले की, इतक्या सगळ्या गोष्टींना न्यायालय पुरावा मानत नाही. त्यामुळे हे सगळे पुरावे घेऊन आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचेही यावेळी सांगितले.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबईतील एका न्यायालयाने राज्यसभा खासदार आणि शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, मुंबईतील रुईया कॉलेजमधील ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका मेधा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय राऊत यांनी तिच्यावर आणि तिच्या पतीवर निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक आरोप केल्याचे सांगत तिने आणि तिच्या एनजीओ युवा प्रतिष्ठानने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात तिचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे तिने शिवसेना (UBT) खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

मेधा सोमय्या यांनी वकील विवेकानंद गुप्ता यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०२२ पासून राऊत यांनी त्यांच्या विरोधात माध्यमांना “दुर्भावनापूर्ण आणि अनुचित विधाने” दिली होती आणि ती छापली, प्रकाशित केली गेली आणि मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली गेली. मीडिया दुर्भावनापूर्ण विधाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली होती, अशी तक्रार केली.

राऊत यांचे वकील आणि त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, त्यांनी जामीन याचिका दाखल केली असून या आदेशाविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात दाद मागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत