वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार नाईक महामंडळाच्या माध्यमातून १०० कोटींची तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी

वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार आहे. तसेच या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत या समाजाच्या विविध समस्या निराकरण करण्यासाठी इदाते आयोगाच्या शिफारशींचा विचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर वडार समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार राजन विचारे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रणिती शिंदे,  आमदार भारत भालके, ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुलेआदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘वडार समाजाने  विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या समाजाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आता या समाजाच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली आहे. वडार समाजातील बेघर लोकांना घरांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल. वस्ती असलेल्या जमीनीच्या जागेचे मालकीचे अधिकार प्रदान करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

वडार समाजातील शिक्षण संस्थासाठी आणि वसतिगृहांसाठी जमीन देण्याचा राज्य शासन प्राधान्याने विचार करणार असून खाणी वितरणात वडार समाजाला आरक्षण देता येईल का ? याबाबत राज्य शासन विचार करील.  वडार समाजातील युवक स्वयंरोजगाराकडे वळावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांत समाजातील मजूर संस्थांना दहा टक्के कामे राखीव ठेवण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वडार समाजाच्या विकासासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत चौगुले यांना राज्य मंत्री दर्जा दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अरविंद लिंबावळे यांची भाषणे झाली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा, वाटचाल दिवाळखोरीकडे तिसरी व चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानीच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात स्थान नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *