१० वर्षापूर्वी देशात नवी कर पद्धती लागू केल्यानंतर आणि करदात्यांसाठी जूनी कर प्रणाली आणि नवी करप्रणाली अशा दोन करप्रणालीचा पर्याय दिल्यानंतर देशातील तमाम नव्या सरकारचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामण यांनी अर्थसंतकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी कर दात्यांसाठी नवी घोषणा करत केली आहे. करदात्यांसाठी पुढील आठवड्यात नवे विधेयक संसदेत मांडणार असल्याची घोषणा केली. तसेच मध्यमवर्गीयांसाठी १२ लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त राहणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
या नव्या करप्रमाणीत करदात्यांसाठी करप्राप्त उत्पन्न मर्यादेत बदल करण्याची मागणी असलेल्या मध्यवर्गीयांसाठी नवी कर अंतिम करप्रणाली जाहिर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कर कपातीचे प्रमाणीकरताना टीडीएस बाबतही नवे धोरण स्विकारले जाणार आहे. त्याचबरोबर रिमिट्न्सही बाबतही नवा निर्णय घेतला जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज कर सवलत जाहिर करताना म्हणाल्या की, परंतु आज कर सवलत देताना ज्येष्ठ नागरिकांना ५० हजारा रूपयांपर्यंतच्या उत्पन्नात दुपटीने अर्थात १ लाखापर्यंत करमुक्त करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर टीडीएस कपातीततही दुपट्ट रकमेची कपात करण्यात आली आहे.
याशिवाय कर विवरण पत्र सादर करण्यात उशीर झाल्यास त्यास डिक्रिमिनिलायझ-करण्यात आला आहे. तसेच ३१ जुलै पर्यंत सर्व कर विवरण पत्र डिजीटायटेशन करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर विवरणातील ज्या काही गोष्टी आहे त्यावरील विवाद असतील ते सर्व सोडविले जातील असेही यावेळी जाहिर केले.
त्याचबरोबर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या की, देशातील सध्याची असलेल्या करप्रमाली अंतर्गत स्टार्टअपला असलेली कर सवलतीची योजना यापुढेही लागू राहिल असेही यावेळी सांगितले.
पेन्शन फंड, आणि इतर फंड हे गुतंवणूकीच्या अनुषंगाने गुतंवणीस मान्यता देण्यात येत आहे.
डेमोक्रसी, डेमोग्राफीक आणि डिजीटायशेन या नव्या प्रणालीचा कर प्रणालीत वापर करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले. त्याचबरोबर ७ लाख रूपयांपर्यंतचे कर उत्पन्न करप्राप्त होते. मध्यमवर्गीयांसाठी खास योजना जाहिर करताना मात्र १२ लाखापर्यंतचे उत्पन्न ज्यांचे असेल ते करमुक्त राहणार असल्याचेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहिर केले.
त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी यावेळी सांगितले की, या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांच्या हाती जास्तीचा पैसा हाती राहिल आणि आणि त्या पैशाचा खर्च करू शकेल असे सांगत यावेळी पूर्वी असलेल्या कर रचनेतील कर आकारणीतही यावेळी बदल केला. त्याचबरोबर अधिकृत उत्पन्ना व्यतिरिक्त अधिकचे उत्पन्न जर कर दात्यास मिळत असेल तर त्यावर अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच ते उत्पन्न कर प्राप्त राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.
ही औषधे कस्टम ड्युटी फ्री झाल्याने होणार स्वस्त
यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, कॅन्सरसह दुर्धर आजारावरील ३६ औषधे आणि अन्य दुर्धर आजारावरील औषधे ही कस्टम ड्युटी फ्री राहणार असल्याचेही यावेळी जाहिर केले. त्यामुळे आता कॅन्सरग्रस्तांसाठीची आणि इतर दुर्धर आजारावरील औषधे ही रूग्णांना स्वस्त दरात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Marathi e-Batmya