वोलोदिमीर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेत राग अनावर व्हाईट हाऊसमधून वोलोदिमीर झेलेन्स्की विषन्न मनाने बाहेर पडले

अमेरिकेतील वेळप्रमाणे शुक्रवारी सकाळी रशिया-युक्रेन युद्धप्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासमोर लष्करी मदतीच्या बदल्यात युक्रेनमधील खनिज साधनसंपत्ती अमेरिकेला देण्याच्या कराराचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला होता. मात्र त्या प्रस्तावावरील चर्चेसाठी वोलोदिमीर झेलेन्स्की चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी झेलेन्सकी यांच्या स्वागतासाठी आले. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प, उपराष्ट्राध्यक्ष जी डी व्हान्स हे ही उपस्थित होते. तसेच अमेरिकेतील अनेक प्रसारमाध्यमेदेखील उपस्थित होती.

सर्वांसमोरच युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाच्या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनेला यापूर्वीच्या ओबामा, ज्यो बिडेन यांनी जी काही मदत दिली ती… होती असे सांगत पण आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सैन्य तुम्हाला देणार आहोत. दोन आठवड्यात युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरु असलेले युद्ध थांबेल असे आश्वासन दिले. पण अमेरिका करणार असल्याच्या खर्चाच्या बदल्यात तुम्हाला करारावर सह्या कराव्या लागतील असे स्पष्टपणे सांगितले.

त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी करारास नकार देत यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, ज्यो बिडेन यांनी आपणास रशियाच्या युद्धखोरीच्या विरोधात मदत केली. पण त्यावेळी अशा काही कराराची मागणी केली नव्हती. पण आता तुम्ही करार पुढे करत आहात असे सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनीही अप्रत्यक्षरित्या पूर्वीच्या अध्यक्षांनी जी काही मदत केली असेल ती असेल मात्र आता नव्याने मदत हवी असेल तर अमेरिका करणार असल्याच्या खर्चाच्या बदल्यात काही तरी भरपाई म्हणून करार करावा लागेल असे सांगितले.
त्यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपण माझ्याशी मोठ्या आवाजात का बोलत आहात असा सवाल करत अमेरिका नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहीली आहे. तसेच दोन्ही देशात व्यापारी संबध असल्याचे सांगत त्या मदत आणि संबधाच्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा अमेरिकेसोबत आल्याचे सांगितले.

त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी वोलोदिमीर झेलेन्स्की यांना विचारणा करत म्हणाले की, तुम्हाला युद्ध स्थगिती नको आहे का, तुमच्या देशातील लोक मरत आहेत, तुम्ही करारावर सही करून मदत घेतली नाही तर तुमचा लगेच पराभव होईल असा इशारा देत तुम्ही अमेरिकेचा अपमान करत आहात असे सांगत करारावर स्वाक्षरी नाही तर तुम्ही अमेरिकेचे सहकार्य मिळणार नाही असा गर्भित इशाराही यावेळी दिला. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स, आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांच्यातील वाद काहीसा वाढल्याने अखेर वोलोदिमीर झेलेन्स्की अखेर या बैठकीतून बाहेर पडले.

युक्रेनच्या अध्यक्षांनी रशियाचा “खूनी” नेता म्हणून संबोधले त्याच्याशी तडजोड करण्याची गरज आहे यावर डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात वाद झाला.

तसेच यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी वोलोदमीर झेलेन्स्की यांना फटकारले, त्यांना अधिक “कृतज्ञ” राहण्यास सांगितले आणि म्हणाले, “आम्हाला काय वाटेल ते सांगण्याची तुमची स्थिती नाही.” असेही सुनावले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना सांगितले की त्यांनी रशियाशी “करार करा” किंवा “आम्ही बाहेर पडू”. जवळ बसलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनीही वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना हा “अनादर” आहे असे म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी रशियावर पूर्ण प्रमाणात आक्रमण करणाऱ्या रशियाशी झालेल्या युद्धबंदीमध्ये युक्रेनला “तडजोड” करावी लागेल असे म्हटल्यानंतर हा असाधारण संताप व्यक्त झाला.

“तडजोड केल्याशिवाय तुम्ही कोणतेही करार करू शकत नाही. म्हणून निश्चितच त्यांना काही तडजोड कराव्या लागतील, परंतु आशा आहे की त्या काही लोकांना वाटतात तितक्या मोठ्या नसतील,” असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाचे आक्रमण संपवण्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या दृढनिश्चयाला पत्रकार परिषदेच्या मर्यादा उघड केल्या, जरी अटी युक्रेनच्या पसंतीच्या नसल्या तरीही.

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *